उसगावात घुमला मुक्त वेठबिगारांचा आवाज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उसगावात घुमला मुक्त वेठबिगारांचा आवाज!
उसगावात घुमला मुक्त वेठबिगारांचा आवाज!

उसगावात घुमला मुक्त वेठबिगारांचा आवाज!

sakal_logo
By

विरार, ता. ३ (बातमीदार) ः श्रमजीवी संघटनेच्या संघर्षमय वाटचालीची चार दशकं पूर्णत्वास येत असतानाच ज्या प्रश्नावर संघटना उभी राहिली, त्या वेठबिगारीमुक्तीच्या लढ्याच्या आठवणींना कामागार दिनानिमित्त उजाळा मिळाला. कामगार दिनाचे औचित्य साधून श्रमजीवी संघटनेने मुख्यालय उसगाव येथे ‘मुक्त वेठबिगार बांधवांचा मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. वेठबिगारीमुक्तीसाठी लढलेल्यांचे स्मरण करत वेठबिगारीतून मुक्त झालेल्यांचा सन्मान श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित आणि विद्युलता पंडित यांच्या हस्ते करण्यात आला.
या मेळाव्यात संघटनेच्या स्थापनेच्या वेळी मुक्त झालेले अनेक वेठबिगार जे आजही हयात आहेत, त्यांची उपस्थिती लक्षवेधी होती. या मुक्त वेठबिगार बांधवांचे, त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात सरकार उदासीन असल्याचे या वेळी समोर आले. या वेळी लक्ष्मण लहांगे, दुंदु लाथड, बारकू गणेशकर, दामा देसक, मैना किरकिरा, यशवंत सायरे, रेवती रण (नाशिक), केशव नानकर, विमल परेड, गणेश उंबरसाडा (जिल्हा परिषद सदस्य), स्नेहा दुबे पंडित, रामभाऊ वारणा आदींनी आपले मनोगत व्यक्त केली.

आठवणींना उजाळा
विवेक पंडित यांनीदेखील वेठबिगारीविरुद्ध लढ्याला आठवणींना उजाळा दिला. वेठबिगारच त्या काळचे संघटनेचे नेते होते. त्यांचा त्याग आणि संघर्ष नसता, तर आजच्या या सुवर्णक्षणांचे आपण साक्षीदार होऊ शकलो नसतो, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80949 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top