धारावीत बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी
धारावीत बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी

धारावीत बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी

sakal_logo
By

धारावी, ता. ३ (बातमीदार) : लिंगायत धर्माचे धर्मगुरू वीरशैव जगतज्योती बसवेश्वर महाराज यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा आहे. म्हणून हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज धारावीत मचीगार समाज सेवा संघातर्फे काळा किल्ला परिसरातील संत रोहिदास मार्गावरील अशोक सिल्क मिल कंपाऊंड येथील बसवेश्वर महाराजांच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा केला जातो. धारावीत बसवेश्वर महाराजांचे अनेक अनुयायी आहेत. जयंती मोठ्या उत्साहात साजरी केल्याची माहिती मचीगार समाजाचे नेते राय्यप्पा पिटकेकर यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80951 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top