
डहाणूतील समस्या सोडवणार
डहाणू, ता. ३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात राबवण्यात येत असलेल्या जीवनोपयोगी योजनेतील त्रुटी आणि त्याद्वारे भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यातील येतील. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत त्या दृष्टीने तात्काळ पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली.
डहाणू तहसीलदार कार्यालयात सोमवारी आदिवासी भागांत राबवण्यात येत असलेल्या योजनांतील त्रुटी तसेच समस्यांबाबात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या शिष्टमंडळात रडका कलांगडा, एडवर्ड वरठा, लहानी दौडा आदींचा समावेश होता. या शिष्टमंडळासमवेत तहसीलदार अभिजित देशमुख यांनी आयोजित केलेल्या बैठकीला गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नगर परिषद उपमुख्य अधिकारी प्रदीप जोशी, वन अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सर्रास बाहेर पाठवले जाते; तर औषधे आणि सर्व प्रकारचे साहित्य बाहेरून आणण्यास सांगितलेजात असल्याचे या वेळी सांगण्यात आले. यावर मार्ग शोधण्यासाठी ९ मे रोजी शिष्टमंडळासमवेत अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात जातील, असे सांगण्यात आले. शिवाय ग्रामीण भागातील पाण्याची समस्यादेखील सोडवण्यात येईल, असे आश्वासन देशमुख यांनी शिष्टमंडाळाला दिले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80953 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..