सर्वोत्तम अर्थकारण गृहिणीच करू शकते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोत्तम अर्थकारण गृहिणीच करू शकते
सर्वोत्तम अर्थकारण गृहिणीच करू शकते

सर्वोत्तम अर्थकारण गृहिणीच करू शकते

sakal_logo
By

माणगाव, ता. ३ (वार्ताहर) : घराच्या जबाबदारीसह कुटुंबीयांचा मान-सन्मान राखून उत्तम अर्थकारण सांभाळणारी महिला गृहिणीच असू शकते, असे कौतुक करून त्यांच्या कामाचा सन्मान रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी निजामपूर येथे केला. क्रांती प्रभाग संघ निजामपूर, ग्रामपंचायत निजामपूर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने निजामपूर ग्राम सचिवालयाच्या प्रांगणात महिला बचत गट मार्गदर्शन शिबिर आणि हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष तुकाराम सुतार, निजामपूर विभाग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप जाधव, सचिव किरण पागार, भाले ग्रामपंचायतीचे सरपंच विवेक खानविलकर, बचत गटाच्या मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निजामपूर विभाग महिला अध्यक्ष देविका पाबेकर, क्रांती प्रभाग संघ निजामपूर अध्यक्षा रुकसाना फटाकरे, यशमीन कागदी, दीपिका बाईत आणि महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळताना महिलांना बचत करण्याचे उत्तम गणित माहीत असते. आज आईच्या संस्कारामुळेच इथपर्यंत पोहचले, असे आवर्जून अदिती तटकरे सांगायला विसरल्या नाहीत. यावेळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बचत गटांना आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले. देविका पाबेकर, फणसे यांच्यासह अनेकांनी बचत गटांना सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80963 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top