अनिता गोयल यांच्या आर्ट शोचे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनिता गोयल यांच्या आर्ट शोचे प्रदर्शन
अनिता गोयल यांच्या आर्ट शोचे प्रदर्शन

अनिता गोयल यांच्या आर्ट शोचे प्रदर्शन

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः अनीता गोयल यांच्या आर्ट शोचे प्रदर्शन जुहू परिसरातील सोहो हाऊसमध्ये भरवण्यात आले आहे. ५ मेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. अनिता गोयल यांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या अशा पद्धतीचा वापर करून चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. नेहमीप्रमाणे चौरस किंवा आयताकृती कॅनव्हासचा वापर न करता अनियमित आकाराच्या कॅनव्हासवर आपल्या चित्रांना साकारले आहे. या आर्ट शोमधून होणाऱ्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा एक भाग ऑटिझमसंबंधी कार्य करणाऱ्या यश चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला दानस्वरूपात दिला जाणार आहे. अभिनेता फोटोग्राफर लव सिन्हा आणि स्टॅण्डअप कॉमेडियन अतुल खत्री यांनी या वेळी उपस्थित राहून अनिता यांच्या प्रदर्शनाची शोभा वाढवली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80966 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top