
काँग्रेसकडून एकतेचा संदेश
मानखुर्द, ता. ३ (बातमीदार) ः चेंबूरच्या वाशीनाका परिसरातील मुकुंदनगरमध्ये मंगळवारी (ता. ३) काँग्रेसच्या वतीने रमजान ईद व अक्षय तृतीया हे सण अनोख्या पद्धतीने साजरे केले. हिंदू-मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशातून काँग्रेस कार्यकर्ते राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर, सीमा माहूलकर हे या वेळी उपस्थित होते. ईदची नमाज अदा करून परतणाऱ्या मुस्लिम बांधवांना तसेच अक्षय तृतीयेनिमित्त हनुमान मंदिरातून प्रार्थना करून परतणाऱ्या हिंदू बांधवांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत काँगेसने एक अनोखा उपक्रम राबवला. यावेळी चेंबूरच्या आरसीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब घावटे हेदेखील पथकासह या आयोजनात सहभागी झाले होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजात शांती राहावी, म्हणून सर्व घटकांमध्ये एकोपा टिकवण्याचे आवाहन केले. या वेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक समाजसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80967 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..