
वाशी रेल्वे पोलिसांकडून मोबाईल चोर जेरबंद
मानखुर्द, ता. ३ (बातमीदार) ः रेल्वे प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. नूर आलम अन्सारी (वय ४०) असे त्याचे नाव असून त्याने मागील आठवड्यात (ता. २९) जॉन हसन (वय ३५) या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढला होता. त्याने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून पोलिसांनी नूरच्या मुसक्या आवळून चोरलेले मोबाईल जप्त केले.
जॉन हसन हे प्रवासी गोवंडी स्थानकातून रेल्वे गाडीत चढत असताना त्यांचा मोबाईल हिसकावून नूरने पळ काढला होता. वाशी रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा खबऱ्यांकडून गोवंडीत राहणारा सराईत चोर नूरविषयी माहिती मिळाली.त्या अनुषंगाने पोलिसांनी नूरचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने या गुन्ह्यासह आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली.त्या दोन्ही गुन्ह्यात त्याने चोरलेले मोबाईल पोलिसांनी जप्त करत दोन्ही गुन्ह्यांची यशस्वी उकल केली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80970 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..