
जोखिम टाळण्यासाठी बँक लॉकर्सला पसंती
वाशी, ता. ४ (बातमीदार)ः शाळा-महाविद्यालयाला सुट्टी लागल्याने गावी जाणारे, फिरायला, जत्रा, लग्नसराईनिमित्त बाहेर जाण्याचे बेत अनेकांनी आखले असून आगाऊ नोंदणीही केली आहे, पण घराला टाळे ठोकून बाहेर गेल्यानंतर घरांतील वस्तूंची, दस्ताच्या सुरक्षेची काळजी वाटते. गेल्या काही दिवसांत शहरात घरफोडीच्या घटना वाढल्याने अनेक नागरिकांनी जोमीख टाळण्यासाठी बॅंक लॉकर्सला पसंती दिली आहे.
वाढत्या गुन्हेगारीच्या घटना आणि चोऱ्यांची जोखीम टाळण्यासाठी नवी मुंबईकरांनी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमधील लॉकर्समध्ये सुरक्षिततेसाठी दागदागिने, मौल्यवान दस्त ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे शहरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांचे लॉकर्स मिळणे अनेकांना दुरापास्त झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिस प्रशासनाच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
गेल्या काही दिवसांत विविध बँकांमध्ये लॉकर्सची मागणी वाढली आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांसह सहकारी बँकांमध्येही हीच परिस्थिती आहे. निर्धारित लॉकर्सपेक्षा अधिक लॉकर्स बँकेत उघडता येत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
सुरक्षा महत्त्वाची
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात ४० च्या आसपास बँका आहेत. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या १२ ते १५ च्या आसपास असून त्यांना अधिक पसंती दिली जात आहे. या बॅंकांमध्ये १०० ते १५० पर्यंत ग्राहकांचे लॉकर्स आहे. सुरक्षेच्या कारणास्तव बँकेच्या अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80972 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..