घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद
घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

घरफोड्या करणारा सराईत चोर जेरबंद

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (बातमीदार) : कोपरखैरणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोराला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मोईनूल अब्दुल मालिक इस्लाम असे या चोराचे नाव आहे. त्याने कोपरखैरणे परिसरात केलेले घरफोडीचे ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुह्यातील १० लाख ३३ हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

कोपरखैरणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुह्यांत वाढ झाल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकाऱ्यांसहित विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकाने मोहम्मद मोईनूल अब्दुल मालिक इस्लाम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने कोपरखैरणे भागात ९ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी २०१८ मध्ये त्याने अशा प्रकारचे ४ गुन्हे केले होते. त्या वेळी त्याला अटक झाली होती. या गुह्यांत जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा घरफोड्या करण्यास सुरुवात केल्याचे तपासात आढळून आले आहे. न्यायालयाने आरोपीला ४ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80973 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top