१२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणपूर्तीचे उद्दिष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणपूर्तीचे उद्दिष्ट
१२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणपूर्तीचे उद्दिष्ट

१२ ते १४ वयोगटाच्या लसीकरणपूर्तीचे उद्दिष्ट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : संपूर्ण राज्यात १२ ते १४ वयोगटातील लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईत लसीकरणाचा वेग कमी आहे. जवळपास २५ टक्के मुलांनीच आतापर्यंत लशीचा पहिला डोस घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मुंबईतील सोसायट्यांमध्ये शिबिर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
राज्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी १६ मार्चपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. चार लाख लोकसंख्येपैकी जवळपास ९८ हजार मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. यात मुंबई शहराचे लसीकरण राज्याच्या सरासरीपेक्षा (५२ टक्के) अर्धे आहे. त्यामुळेच पालिकेने सोसायट्यांमध्ये शिबिर भरवून लसीकरणाला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रभागात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

लसीकरण वाढवण्याच्या सूचना
१) पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्याला लसीकरणाचा आढावा घेऊन ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. १२ ते १४ वयोगटातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आणि १५-१७ जवळपास ४३ टक्के मुलांचे लसीकरण बाकी आहे.
२) आता शाळाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरे जास्तीत जास्त प्रमाणात राबवली जाऊ शकतात. यासह सोसायट्याही प्रभाग कार्यालयात जाऊन याबद्दल विचारणा करू शकतात. जरी आठ ते नऊ लहान मुले असतील तरी पालिका तिथे लसीकरण राबवणार असल्याचे गोमारे यांनी सांगितले.

प्रतिसाद नाहीच...
मुलांच्या लसीकरणाबाबत पालकांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळेही या लसीकरणाचा वेग वाढताना दिसत नाही. याच कारणातून सोसायट्यांमध्ये लसीकरण शिबिरे भरवल्यानंतरही त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, असे एका सोसायटीच्या सदस्याने सांगितले. दरम्यान, बालरोग तज्ज्ञ कोविड टास्क फोर्स सदस्यांनी कोणत्याही विषाणूपासून बचावासाठी लसीकरण हे महत्त्वाचे हत्यार असल्याचे सांगितले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80976 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top