नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद

sakal_logo
By

उरण, ता. ३ (वार्ताहर) : नगरपालिका व नगरपंचायत कर्मचारी, सवर्ग कर्मचारी सफाई कामगारांनी सोमवारपासून (ता. २) राज्यात बेमुदत काम बंद आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या संपात उरण नगरपालिकेमधील ७४ कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे उरणमधील नगरपरिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.

राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला शंभर टक्के वेतन कोषागारामार्फत मिळावे, सहायक वेतन अनुदानाऐवजी वेतन अनुदान मंजूर करावे, कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे तीन हप्ते मिळावेत, हंगामी व ठेकेदार कर्मचाऱ्यांना समान कामाला समान वेतन या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वेतन मिळावे, तसेच सर्व कायदेशीर लाभ मिळावेत, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ऑनलाईन बैठकीतही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या संपात उरण नगरपरिषदेचे ७४ कामगार सामील झाल्याची माहिती कामगारांचे नेते सुरेश पोसतांडेल यांनी दिली.

या संपामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर परिणाम झाला असल्याची माहिती उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80977 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top