नेरुळमध्ये पथदिव्यांच्या डागडुजीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुळमध्ये पथदिव्यांच्या डागडुजीची मागणी
नेरुळमध्ये पथदिव्यांच्या डागडुजीची मागणी

नेरुळमध्ये पथदिव्यांच्या डागडुजीची मागणी

sakal_logo
By

नेरूळ, ता. ४ (बातमीदार) ः नेरूळ नोडमध्ये प्रभाग क्रमांक ८५ व ८६ मध्ये बसवण्यात आलेले पथदिवे कार्यान्वित झालेले नाहीत. ते बल्ब बसवून कार्यान्वित करण्यात यावेत, अशी मागणी महादेव पवार यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच जुने पथदिवे काढून टाकावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

नव्याने बसवण्यात आलेल्या पथदिव्यांतून जुन्या पथदिव्यांच्या तुलनेत प्रकाश कमी व अंधुक येत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून येत आहेत. अंधुक प्रकाश जिथे असेल तिथे नव्याने बल्ब बसवावेत. प्रभाग ८५ व ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे, तसेच कुकशेत गावातील पथदिव्यांची पाहणी करून केबल्सची तपासणी करावी. छोट्या-छोट्या चौकात छोटेखानी हायमस्ट बसवावेत, अशी मागणी पवार यांनी केली आहे. पुरेसा उजेड रस्त्यावर उपलब्ध झाल्यास चोऱ्यांच्या प्रकारालाही आळा बसेल. त्यामुळे संबंधितांना प्रभाग ८५ व ८६ मध्ये पथदिव्यांच्या डागडुजीचे व अन्य समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80979 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top