
धारावीत हिंदू-मुस्लिम सणांचा उत्साह
धारावी, ता. ३ (बातमीदार) : अक्षय तृतीया व रमजान ईद एकाच दिवशी आल्याने हिंदू-मुस्लिम धर्मियांत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी गोडधोड पदार्थ बनवले होते. धारावीतील अनेक विभागात हिंदू-मुस्लीम कुटुंब वर्षानुवर्षे एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहत आहेत. एकाच दिवशी दोन्ही धर्मीयांचा सण एकत्र आल्याने एकमेकांना खाद्यपदार्थ दिले जात होते.
हिंदू व खास करून मराठी कुटुंबांनी आजच्या दिवशी आंब्याचे पूजन करून जेवणात आमरस-पुरी किंवा पुरणपोळी बनवून अक्षय तृतीया सण साजरा केला. यासाठी धारावीत अंबा विक्री गेली दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर झाली होती. तर रमजान ईद असल्याने मुस्लिम परिवारांनीही शिर कुर्मा आदी गोड पदार्थ बनवले होते.
...
विद्यार्थ्यांना वह्यावाटप
धारावी झोपडपट्टी पोलिस पंचायत बिट नं- २ व युनायटेड शतोकोन काराडे ॲकॅडमी यांनी संयुक्तपणे अक्षय तृतीयेनिमित गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल व वह्यांचा संच अशा शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर, अलका साबळे, शंकर पोटे,
नामदेव आबाणावे, शिला मस्के, बाळू शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शेवटी उपस्थितीतांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g80982 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..