
शांतता भंग करण्याचा कुणी प्रयत्न करू नये! - रजनीश सेठ
मुंबई - मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील (Masjid) भोंगे (Loudspeaker) हटवण्यासाठी ४ मेपर्यंतची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. राज्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असून कुणीही शांतता, सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस महासंचालक रजनीश सेठ (Rajneesh Sheth) यांनी दिला.
राज ठाकरे यांनी ४ मेपासून मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यापुढे लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचे आदेश मनसे कार्यकर्त्यांना केले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिस कुठलीही परिस्थिती हाताळण्यास सक्षम असून राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस महासंचालकांनी दिला. तसेच कायदा हातात घेणाऱ्या व्यक्तींविरोधात थेट कारवाई करण्याचे आदेश राज्यातील पोलिसांना दिले.
पोलिस यंत्रणा सज्ज
- राज्य राखीव पोलिस दल, होमगार्डच्या तुकड्या तैनात
- सर्व पोलिस अधिकारी, जवानांच्या रजा रद्द
- आतापर्यंत १३ हजार लोकांना प्रतिबंधात्मक नोटिसा
- गुन्हेगार, समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई
- मोहल्ला आणि शांतता समितीच्या बैठका सुरू
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81000 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..