तळेगावात आढळल्या विरगळच्‍या ऐतिहासिक खाणाखुणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावात आढळल्या विरगळच्‍या ऐतिहासिक खाणाखुणा
तळेगावात आढळल्या विरगळच्‍या ऐतिहासिक खाणाखुणा

तळेगावात आढळल्या विरगळच्‍या ऐतिहासिक खाणाखुणा

sakal_logo
By

माणगाव ता. ३ (बातमीदार) : महाराष्ट्रदिनी ‘आम्ही सह्याद्रीचे शिलेदार’ संस्थेमार्फत वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली. याच दिवशी तळेगाव तर्फ गोरेगाव येथील प्राचीन शिवमंदिर आणि परिसरात संस्थेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्‍ये चौदाव्या शतकातील मंदिराचे अवशेष सापडले आहेत.
तळेगाव ऐतिहासिक गाव असून बऱ्याच ऐतिहासिक खुणा गावातील स्थानिक शिवप्रेमी सुजित खैरे यांच्या नजरेस आल्या होत्या. हे अवशेष वर्षानुवर्षे गाळात गाडले गेल्याने त्यांची साफसफाई होणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यावर ‘आम्ही सह्याद्रीचे शिलेदार’ या दुर्गसंवर्धन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला मदतीची हाक दिली. या संस्थेने त्याला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रदिनी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत संस्थेच्या सर्व सदस्यांसोबत शाळेतील लहानग्या सहकाऱ्यांनीही खारीचा वाटा उचलला. मोहिमेसाठी संस्थेच्‍या पदाधिकाऱ्यांनी आणि सुजित खैरे यांनी इतिहास अभ्यासक आणि संशोधक डॉ. अंजय धनावडे यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. स्वच्छता मोहिमेदरम्यान त्यांना चौदाव्या शतकातील मंदिराचे अवशेष आढळले आहेत. या सर्व अवशेषांची त्यांनी पाहणी केली असून लवकरच त्‍याचा अहवाल संशोधनात्मक इतिहास अभ्यासकांसाठी कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोहिमेसाठी सरपंच नीलेश म्हात्रे, उपसरपंच वैभव मोरे, रामदास भवरे, संतोष सावंत, राजाराम वाघमारे, दत्ताराम गुगळे, विश्‍‍वनाथ मठाल, विजय वाघमारे, नथुराम वाघमारे, गणेश वाघमारे, मोहन खैरे, राजाराम नागे आदी ग्रामस्थांची मदत झाली.
--------------
--
तळेगावात ठिकठिकाणी वीरगळ, सतीशीळा यांचे अवशेष आढळून येतात. स्थानिकांनी ही ऐतिहासिक अवशेष वस्तुसंग्रहालयात जपून ठेवल्या, तर गावाचा इतिहास जपला जाईल.
- डॉ. अंजय धनावडे, अध्यक्ष, कोकण इतिहास परिषद, रायगड शाखा
--------------
गावाशेजारी, आजूबाजूला पुरातन, ऐतिहासिक अवशेषांचा ठेवा आहे. या दृष्टीने स्वच्छ्ता अभियान राबवले होते. यामध्ये विरगळ, चौथरे व अन्य बाबी स्पष्ट दिसून आल्या आहेत. यावर अधिक संशोधन झाल्यास गावचा इतिहास कळून येईल.
- सुजित खैरे, इतिहासप्रेमी, ग्रामस्थ

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81002 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top