बाजारांत कोट्यवधींची उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारांत कोट्यवधींची उलाढाल
बाजारांत कोट्यवधींची उलाढाल

बाजारांत कोट्यवधींची उलाढाल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ : शहरासह, पनवेल, उरण परिसरातील बाजारपेठांमध्ये अक्षय्य तृतीयेनिमित्त गर्दीचा महापूर आला होता. नागरिकांनी सोन्याच्या दागिन्यांची जोरदार खरेदी केल्‍याने सराफा दुकाने फुलून गेली होती. वाहन खरेदीलाही जोर चांगला होता. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या शोरूमबाहेर वाहनांची डिलिव्हरीसाठी रांगा लागल्या होत्या. तर अनेकांनी स्वप्नातील घरांमध्ये प्रवेश केला.
दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्‍सव साजरे करण्यावर निर्बंध आले होते. नियमांमुळे बाजारपेठांमध्ये हवी तशी रेलचेल नव्हती. मात्र आता कोविड निर्बंध हटल्यामुळे बाजारपेठा पुन्हा सजल्‍या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त नागरिकांनी खरेदी केल्यामुळे शेकडो कोटींची उलाढाल बाजारपेठेत झाली.
गेल्‍या दशकात जेवढी विक्री झाली नाही, तेवढी यंदाच्या मुहूर्तावर झाल्याची प्रतिक्रिया नवी मुंबईतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तर वाहन क्षेत्रात आलेली मंदीही अक्षय्य तृतीयेने पळवून लावली. या मुहूर्तावर अनेकांनी दुचाकी, चारचाकी वाहनांची डिलिव्हरी तर काहींनी नोंदणी केली. बांधकाम क्षेत्रातही झळाळी मिळाली असून हजारो कोटी रुपयांच्या घरांची बुकिंग अनेकांनी केली. उलवे, द्रोणागिरी, तळोजा, खारघर, पुष्पकनगर, वडघर, करंजाडे आदी भागात विकसकांकडे अनेकांनी घरांची खरेदी केली.

नवी मुंबईत शांततेत ईद साजरी
नवी मुंबईतील सानपाडा, वाशी, घणसोली, नेरूळ, खारघर आदी ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून रमजान ईद साजरी केली. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना पुष्पगुच्छ आणि आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नवी मुंबई पोलिसांकडून भेटी देऊन मुस्लिम बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. सीवूड्स येथे मैदानावर सकाळी नमाज अदा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. शहरात सर्वच ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81003 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top