इतिहासकालीन बैठ्या खेळांचे अनोखे प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इतिहासकालीन बैठ्या खेळांचे अनोखे प्रदर्शन
इतिहासकालीन बैठ्या खेळांचे अनोखे प्रदर्शन

इतिहासकालीन बैठ्या खेळांचे अनोखे प्रदर्शन

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. ३ (बातमीदार) : इतिहासकाळात बुद्धी तल्लख व्हावी, मानसिक स्थिती सक्षम राहावी, यासाठी युद्धाला जाण्याअगोदर बुद्धीला चालना देणारे बैठे खेळ खेळले जात असत. अशा विविध बैठ्या खेळांचे एक अनोखे प्रदर्शन दादरमध्ये भरले असून नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
इतिहासाचा वेध घेणारे शिवकालीन शास्त्रास्त्रे, नाणी व बैठे खेळ यांचे सुंदर आणि माहितीपूर्ण प्रदर्शन दादरच्या शिवाजी मंदिर येथील शाहू सभागृहात भरवण्यात आले आहे. बुधवार (ता. ४) पर्यंत नागरिकांना ते पाहता येणार असल्याची माहिती आयोजक आशिष कदम यांनी दिली. या प्रदर्शनातील या खेळांच्या विभागात अनेक जण उत्सुकतेने रेंगाळताना पाहायला मिळाले.
बैठ्या खेळाचे त्या काळीही मोठे महत्त्व होते. मनोरंजनासोबत आणि युद्धासाठी कसा त्यांचा उपयोग होत होता, याची माहिती खेळ अभ्यासक पंकज भोसले यांनी प्रदर्शनास आलेल्यांना दिली. विरंगुळा म्हणून खेळाची निर्मिती केली. दगडावर कोरलेल्या खेळापासून ते अगदी लाकूड, कपडे आदींवर हे खेळ बनवले गेले. मंकला, विमानाम, चतुरंग, अक्स दुता, गंजिफा, कवड्या असे खेळ खेळले जात असत. ते खेळ या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. या खेळांवर गेली आठ वर्षे संशोधन करणारे पंकज तळमळीने खेळाचे महत्त्व पटवून सांगतात. गेली २२ वर्षे सुनील कदम यांनी जतन केलेली शिवकालीन शास्त्रास्त्रे, नाणी, तोफ गोळे, भाले, वाघनखे, तलवारी यांचे प्रदर्शनही एक वेगळा अनुभव देणारे आहे.
...
आजच्या मोबाईलच्या युगात मुलांच्या दृष्टीवर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यांच्या जडणघडणीवर बदल होताना दिसत आहे. त्यामुळे मुलांनी अशा जुन्या बैठ्या खेळांकडे वळल्यास त्यांचा बौद्धिक विकास घडेल, त्यांची विचारशक्ती वाढेल, त्यांनी एखादा खेळ स्वतः बनविल्यास त्यांची कल्पकता दिसून येईल. त्यामुळे अशा खेळांचा त्यांना नक्कीच उपयोग होऊ शकेल.
- पंकज भोसले, ऐतिहासिक खेळांचे अभ्यासक

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81008 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top