भिषण आगीत गोदाम खाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिषण आगीत गोदाम खाक
भिषण आगीत गोदाम खाक

भिषण आगीत गोदाम खाक

sakal_logo
By

कल्याण, ता. ३ (बातमीदार) ः कोविड चाचणी करण्यासाठीचे साहित्य बनवणाऱ्या खासगी कंपनीला मंगळवारी (ता. ३) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत येथील गोदाम जळून खाक झाले. ही घटना डोंबिवली एमआयडीसी येथील फेज २ मध्ये घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर सकाळी सहाच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर सकाळी ११ वाजेपर्यंत कूलिंगचे काम सुरू होते. नेमके किती नुकसान झाले, याची माहिती मिळू शकली नाही. या खासगी कंपनीच्या मालकाला विचारल्यानंतरच ही माहिती समोर येईल, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81011 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top