बुलेट चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुलेट चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक
बुलेट चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

बुलेट चोरीच्या गुन्ह्यात तिघांना अटक

sakal_logo
By

कळवा, ता. ३ (बातमीदार) ः कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २७ एप्रिल रोजी बुलेटची चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मंदार सदाशिव निगवेकर (३६) यांनी ५० हजार रुपये किमतीची बुलेट चोरीला गेली असल्याची तक्रार २८ एप्रिल रोजी दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. जुनैद अन्वर अन्सारी (वय २६), सादिक वजित सय्यद (२५) व शाहबाज सनवर हुसैन अन्सारी (१९) अशी आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी मुंब्रा येथील रहिवासी आहेत.

बुलेट चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत तपासाला सुरुवात केली. तेव्हा या परिसरात बऱ्याच दुचाकी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता गुन्हा घडला त्या ठिकाणी एक आरोपी फोनवर बोलत असल्याचे आढळून आले. याच्या आधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींची चौकशी केली असता त्यांच्याकडून पाच गुन्ह्यांची उकल झाली. या तिघांकडून पोलिसांनी दोन बुलेट आणि तीन इतर अशा एकूण पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होणार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने त्या तिघांना ५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81012 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top