स्टेम प्राधिकरणाकडून कमी पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेम प्राधिकरणाकडून कमी पाणीपुरवठा
स्टेम प्राधिकरणाकडून कमी पाणीपुरवठा

स्टेम प्राधिकरणाकडून कमी पाणीपुरवठा

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : स्टेम प्राधिकरणाकडून मिरा-भाईंदर शहराला दररोज होत असलेल्या पाणीपुरवठ्यात घट झाली आहे. याचा शहरातील पाणी वितरणावर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी (ता. ४) महापालिकेत पाचारण केले असून सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत यावर महत्त्वाची चर्चा होणार आहे.
मिरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) या दोन संस्थांकडून पाणीपुरवठा होत होता. यातील स्टेम प्राधिकरणाकडून दररोज ८६ दशलक्ष आणि एमआयडीसीकडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर आहे, परंतु सध्या स्टेम प्राधिकरणाकडून मिरा-भाईंदरला दररोज केवळ ७४-७५ दशलक्ष लिटर पाणीच मिळत आहे. आधीच मिरा-भाईंदरला गरजेपेक्षा कमी पाणी मंजूर आहे. त्यात स्टेम प्राधिकरणाकडून मंजूर कोट्यापेक्षा कमी पाणी दिले जात आहे. याचा शहरातील पाणी वितरणावर परिणाम होत आहे. याची दखल घेत महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बुधवारी (ता. ४) स्टेम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना महापालिका मुख्यालयात पाचारण केले आहे. या वेळी महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आणि विरोधी पक्षांचे गटनेतेदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या जलवाहिनीवरून काही गावांना आणि वसाहतींना देण्यात आलेल्या जोडण्यांवरूनही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
...तर पुन्हा आंदोलन
यापूर्वी एमआयडीसीकडूनदेखील मंजूर कोट्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्यावरून आंदोलन करण्यात आले होते. पाणीटंचाईवरून त्या वेळी सत्ताधारी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्या आंदोलनात स्वत: महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी आमदार नरेंद्र मेहता सहभागी झाले होते; तर शिवसेनेनेही प्रत्येक प्रभाग कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या वेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत पाचारण करून मंजूर कोट्यानुसार पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यानंतर एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली होती. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून मंजूर कोट्यानुसार पाणी मिळाले नाही, तर आंदोलन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81013 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top