
लाकडी बांबूने मारहाण
लाकडी बांबूने मारहाण
नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : लाकडी बांबूने एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना कोपरा पुलाच्या परिसरात घडली आहे. खारघर सेक्टर १४ मध्ये राहणारे ब्रह्मानंद तिवारी हे सायन-पनवेल रस्त्यावर कोपरा पुलाखालून त्यांच्या गाडीने कार्यालयात जात होते. त्या वेळी एका तरुणाने त्यांची गाडी थांबवून त्यांना लाकडी बांबूने मारहाण केली आहे. यात त्यांना मनगटाजवळ दुखापत झाली आहे.
----
मुलाचे अपहरण
नवीन पनवेल (वार्ताहर) : उसर्ली खुर्द येथील १५ वर्षीय मुलगा त्याच्या राहत्या घराच्या इमारतीच्या खाली खेळण्यासाठी गेला होता. त्याचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. या मुलाची उंची १६६ सें.मी., बांधा सडपातळ, चेहरा गोल, वर्ण गोरा, केस काळे असून अंगात राखाडी रंगाची जिन्स पॅन्ट असून लालसर रंगाचा फुलबाह्याचा शर्ट परिधान केला आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा.
----
दुचाकी गाडीची चोरी
नवीन पनवेल (वार्ताहर) : राहत्या घराच्या इमारतीखाली उभी करून ठेवलेली मोटरसायकल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शुभम वायंगणकर (रा. पनवेल) यांनी त्यांची मोटरसायकल क्र. एमएच ४६ यू ०३१२ ही राहत्या इमारतीच्या खाली उभी करून ठेवली होती. ही दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81015 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..