वसई-विरारमधील उड्डाणपूल कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसई-विरारमधील उड्डाणपूल कागदावरच
वसई-विरारमधील उड्डाणपूल कागदावरच

वसई-विरारमधील उड्डाणपूल कागदावरच

sakal_logo
By

वसई, ता. ५ (बातमीदार) ः वसई-विरारमध्ये वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त आहेत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सुटावी म्हणून शहरात रेल्वे उड्डाणपुलाचे जाळे निर्माण केले जाणार आहे. एमएमआरडीएकडे हा विषय प्रस्तावित आहे; मात्र ही योजना केवळ कागदावरच राहिली आहे. वसई, नालासोपारा व विरार रेल्वे उड्डाणपुलांचे काम रखडले आहे. वसई-विरार शहरात वाहनांची वर्दळ सुरू असते. परिणामी वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. अत्यावश्यक सेवांनादेखील या कोडींचा फटका बसतो आहे. अशातच शहरात मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे चार रेल्वे उड्डाणपूल निर्मितीचे काम प्रस्तावित आहे. यातील केवळ नायगाव, उमेळमान हा उड्डाणपूल नुकताच पूर्ण झाला आहे, परंतु वाहतूक सुरू झाली नाही. नालासोपारा-अलकापुरी, विरार-विराट नगर व वसई हे उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. या कामांकरिता एकूण २५० कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. वसई-विरार महापालिकेकडे इतका निधी नसल्याने एमएमआरडीएकडून हे काम केले जाणार होते; मात्र प्रत्यक्षात अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. शहराचा पूर्व व पश्चिम भाग उड्डाणपुलाने जोडले गेल्यास कोंडीतून नागरिकांची सुटका होऊन वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे नागरिक उड्डाणपुलाची प्रतीक्षा करत आहेत.

आयुक्तांचे पालकमंत्र्यांना पत्र
विरार-विराट नगर उड्डाणपूल लवकर उभारण्यात यावा, याकरिता एमएमआरडीएला या कामाबाबत निर्देश द्यावेत याकरिता आयुक्त अनिलकुमार पवार यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना पत्र दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शासकीय स्तरावर वसई, नालासोपारा व विरार येथील रेल्वेअंतर्गत उड्डाणपुलाच्या प्रस्तावित कामाबाबत पाठपुरावा करणार आहोत. जेणेकरून नागरिकांना भेडसावणाऱ्या कोंडीच्या समस्येचे निराकरण होईल. एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबतदेखील यासंदर्भात बैठक घेऊ.
दादा भुसे, पालकमंत्री

सर्वाधिक कोंडीची ठिकाणे
आचोळे, तुळिंज मार्ग, नालासोपारा पूर्व
विरार रेल्वेजवळील पूर्व व पश्चिम परिसर
वसई पूर्वेकडील नवघर औद्योगिक वसाहत मार्ग
वसई पश्चिम माणिकपूर, रेल्वे परिसर
आचोळे मार्ग, अलकापुरी, सेंट्रलपार्क
सातिवली, वालीव, गोखिवरे, रेंजनाका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81021 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top