पारगाव-डुंगीचे होणार पुनर्वसन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारगाव-डुंगीचे होणार पुनर्वसन!
पारगाव-डुंगीचे होणार पुनर्वसन!

पारगाव-डुंगीचे होणार पुनर्वसन!

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. ३ (वार्ताहर) ः पनवेलजवळ नवी मुंबई विमानतळाशेजारी असलेल्या पारगाव डुंगीच्या गावच्या पुनर्वसनासंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक घेतल्‍याची माहिती पारगाव डुंगीच्या सरपंच अहिल्या बाळाराम नाईक यांनी दिली आहे.
पारगावालगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम सुरू असलेल्या दगड-मातीचा भरावामुळे अनेक वर्ष पावसाळ्यात पूरस्‍थिती निर्माण होते. पावसाच्या पाण्यामुळे पारगाव-डुंगी गावातील रहिवाशांच्या घरात पाणी जाऊन नुकसान होऊन अतोनात हाल झाले आहे. डुंगी गावातील रहिवाशांना चार महिन्यांकरिता पावसाळ्यात सिडकोच्या माध्यमातून घरभाडे दिले जाते, जवळपास १०० घरात पाणी जाऊन मोठी वित्तहानी होते.
पारगावच्या सरपंच अहिल्या नाईक, उपसरपंच निशा पाटील, बाळासाहेब नाईक, माजी उपसरपंच मनोज दळवी तसेच सुहास पाटील, सदाशिव पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने पारगाव-डुंगी गावचे पुनर्वसन करून त्‍यांना न्याय मिळवून देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81022 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top