
गरजेपोटी घरासाठी अर्ज करण्यास प्रकल्पग्रस्त अनुत्सुक
उरण, ता.४ (बातमीदार) : सरकारने सिडकोबाधित प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडकोकडून पुराव्यासह अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांनी आपल्या घरांचे पुरावे जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, गरजेपोटीची घरे नियमित करण्यासाठी असलेली नियमावली समोर न आल्याने प्रकल्पग्रस्त अर्ज करण्यास उत्सुक दिसत नाहीत.
महाविकास आघाडी सरकारने २०२२ पर्यंतची सिडको प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आनंदीत झाले होते. मात्र ही घरे नियमित करण्यासाठी सरकारने केवळ आदेश जाहीर केला आहे. त्यासंदर्भात कोणतेही नियम स्पष्ट करण्यात आलेले नाहीत. पण बाधितांना पुराव्यासह अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. हे अर्ज नवी मुंबईतील बेलापूरच्या रायगड भवन येथे सिडकोकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या गरजेपोटी घर या विभागात सादर करावयाचे आहेत. मात्र प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे समाधान होणार नाही, तोपर्यंत अर्ज करण्यास प्रकल्पग्रस्त उत्सुक नसल्याचेच दिसत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81026 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..