
तळोजा, ओवा गावात रमजान ईद उत्साहात
खारघर, ता. ३ (बातमीदार) : ओवा गाव, तळोजा गाव आणि तळोजा वसाहतीत रमजान ईद उत्साहात साजरी झाली. आज सकाळी मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाजपठण केले. गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुरम्याचा आनंद लुटला. दरम्यान, अक्षय्य तृतीयेला मनसेकडून मशिदीसमोर महाआरती करणार असल्याची घोषणा केल्यामुळे खारघर आणि तळोजा पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
गावात हिंदू आणि मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने राहतात. हिंदूंचा अथवा मुस्लिम समाजाचा उत्सव असो एकमेकांना शुभेच्छा देतात, असे ओवे गावातील ज्येष्ठ मंडळींनी सांगितले. खारघर आणि तळोजामधील चिकन, मटण, बिर्याणी दुकानात नागरिकांनी गर्दी केली होती. मित्र, परिवार तसेच घरगुतीसाठी एक ते पाच किलोपर्यंत चिकन बिर्याणीची ऑर्डर जास्त प्रमाणात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81027 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..