दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात
दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात

दोन वर्षानंतर रमजान ईद उत्साहात

sakal_logo
By

नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मोकळेपणाने ईद साजरी होत आहे. दोन वर्षांच्या कोरोनाने लावलेल्या ब्रेकनंतर आता बाजारपेठा पुन्हा फुलू लागल्या आहेत.

नेरूळ येथील जामा मशीद येथे सकाळच्या पहिल्या नमाज पठणाला मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जामा मशिदीजवळ नमाज पठणासाठी एकत्र आले होते. एकमेकांना आलिंगन देत पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी हाजी शावनवाज खान यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबईत आम्ही सगळे हिंदू, मुस्लिम बांधव एकत्र सण साजरे करतो. त्यामुळे नवी मुंबई शांत आहे; मात्र महाराष्ट्रातील काही नेते शांतता भंग करत आहेत, असे त्यांनी म्हटले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81028 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top