
दुचाकी अपघातात बालकाचा मृत्यू
पनवेल, ता. ३ (वार्ताहर) : मोटरसायकलच्या अपघातात एका बालकाचा (वय ५) मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. ३०) मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीजवळ घडली. विहान पाटील असे या मृत बालकाचे नाव आहे. या अपघातात मुलाचे आई-वडील व भाऊ जखमी झाले आहेत. निष्काळजीपणे मोटरसायकल चालवल्याचा ठपका ठेवत मृत मुलाचे वडील तेजस पाटील (वय ३६) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजस पाटील हे पत्नी सोनल (३२) आणि मुले जय (७) व विहान (५) यांना घेऊन दुचाकीवरून अलिबागला जात होते. कर्नाळा खिंडीतील रस्त्याच्या वळणावरून जाताना त्यांचे नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटरसायकल भिंतीवर धडकली. यात चौघेही गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी चौघांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले, पण उपाचारांदरम्यान लहानग्या विहानचा मृत्यू झाला. तेजस पाटील अतिशय भरधाव वेगात दुचाकी चालवत होते. निष्काळजीपणा केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्यामुळे तेजस पाटील यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81032 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..