मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल
मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मिळणार
मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मिळणार

मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल मिळणार

sakal_logo
By

मालाड, ता. ३ (बातमीदार) ः केंद्रीय स्तरावर सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे मच्छीमारांना आता सवलतीच्या दरात डिझेल मिळणार आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्रालयातून २९ एप्रिल रोजी त्याबाबतचे आदेश निघाले आहेत.

डिझेलच्या वाढलेल्या दराबाबत नॅशनल फिशवर्कर्स फोरम (एनएफएफ)चे अध्यक्ष लिओ कोलास यांच्या नेतृत्वाखाली देशातील मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने मार्च महिन्यात केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेतली होती. त्यानुसार २८ मार्च रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या अध्यक्षतेखालील संसद भवन कार्यालयात बैठक झाली होती. मच्छीमारांसाठी डिझेल दरात सवलत देण्याबाबत लवकरच आदेश काढले जातील, असे त्यात ठरले होते. परंतु, तसे आदेश न निघाल्याने ९ एप्रिल रोजी कोळी महासंघाचे अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार गोपाळ शेट्टी, एमएमकेएसचे सरचिटणीस किरण कोळी आदींनी हरदीपसिंग पुरी व पुरुषोत्तम रूपाला यांची भेट घेतली. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्रालयातून २९ एप्रिल रोजी निघालेल्या आदेशानुसार मच्छीमारांना किरकोळ भावात डिझेल उपलब्ध होणार आहे.

शिष्टमंडळात डब्ल्यूएफएफपीचे सदस्य, एनएफएफचे नवनिर्वाचित अध्यक्ष व महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, जनरल सेक्रेटरी ओलेंसो सिमोन्स, खासदार राजेश चुडासमा, जीएफसीबी अध्यक्ष वेलजीभाई मसानी, एनएफएफचे उपाध्यक्ष व एमएमकेएसचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, जीएफबीए अध्यक्ष तुलशीभाई गोयल, एनएफएफ सेक्रेटरी ज्योती मेहेर, एमएमकेएस सरचिटणीस किरण कोळी, उपाध्यक्ष राजेन मेहेर, मुकेश पंज्यारी (पोरबंदर), कन्यालाल सोलंकी, नरशीभाई बारया (जाफराबाद) व मोहनभाई भरत (ओखा) इत्यादी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81038 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top