विलीनीकरणाचा लढा पुन्हा उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विलीनीकरणाचा लढा पुन्हा उभारणार
विलीनीकरणाचा लढा पुन्हा उभारणार

विलीनीकरणाचा लढा पुन्हा उभारणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः उच्च न्यायालयाने फटकारल्याने संपकरी एसटी कर्मचारी तब्बल पाच महिन्यांनंतर कर्तव्यावर हजर झाले; मात्र अद्यापही संपकऱ्यांच्या मनात विलीनीकरणाची धग कायम असल्याचे चित्र आहे. कामावर परतलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या राज्यभरात गोपनीय बैठका सुरू आहेत. त्यातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा योग्य वेळी विलीनीकरणाचा लढा उभारण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा तब्बल पाच महिने संप सुरू होता. कामगार न्यायालयाने या संपाला बेकायदा घोषित केले होते. त्यानंतरही एसटी कर्मचारी संपात सहभागी होते. संपकऱ्यांवर बडतर्फीच्या नोटिसा, निलंबन, बडतर्फी तसेच सेवासमाप्तीची कारवाईही करण्यात आली. दरम्यानच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्याही केल्या. त्यामुळे उच्च न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार करून एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता सेवेत घेण्याच्या सूचना राज्य शासनाला केल्या आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर होण्याचे आदेश दिले.
एसटी कर्मचारी न्यायालयाच्या आदेशानुसार २२ एप्रिलपासून कामावर परतले; मात्र त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच विलीनीकरणाचा लढा पुन्हा पेटवण्याच्या छुप्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटीच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात लढा उभारण्याच्या पोस्ट समाज माध्यमात व्हायरल केल्या जात आहेत.
---
एसटीची सेवा आधीच पाच महिने बंद होती, त्यामुळे लगेच कोणतेही आंदोलन करण्याचा विचार नाही; मात्र विलीनीकरणाची मागणी आम्ही अद्याप सोडली नसून योग्य वेळी पुन्हा आंदोलन उभे करणार आहोत.
- गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81041 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top