आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ
आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ

आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. ३ ः शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत १० मे २०२२ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. २९ एप्रिलच्या पत्रान्वये संचालनालयाचे सुधारित निर्देशांनुसार मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदतवाढ असल्याचे मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दर वर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यानुसार २०२२-२३ शैक्षणिक वर्षासाठीची सोडत सोडत ३० मार्च २०२२ रोजी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत (विद्या प्राधिकरण) काढण्यात आली होती. त्यानुसार ४ एप्रिल रोजी पोर्टलवर निवड यादी व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. पालकांनी पडताळणी समिती व शाळेशी संपर्क साधून १० मे २०२२ पूर्वी आपल्या पाल्याचा शाळेतील प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन पालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81044 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top