चालीसा वाजवण्यावर मनसे ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालीसा वाजवण्यावर मनसे ठाम
चालीसा वाजवण्यावर मनसे ठाम

चालीसा वाजवण्यावर मनसे ठाम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली आहे. ३ मेनंतर भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यावर आम्ही ठाम असल्याचे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. बुधवारी (ता. ४) पहाटे मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत, तर दुप्पट आवाजात चालिसा वाजवणार, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लाऊडस्पीकर हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. बऱ्याच वर्षांपासून हा विषय सुटता सुटत नाही. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे अविनाश जाधव म्हणाले. मशिदींवरील भोंगे पोलिसांनी काढले नाहीत, तर आम्ही हनुमान चालिसा लावणारच. भोंगा उतरवला नाही तर मुंब्रा येथील मशिदीबाहेर संघर्ष करणार, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. संपूर्ण ठाण्यात ही मोहीम हाती घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, बुधवारच्या (ता. ४) आंदोलनासाठी मनसेने तयारी केली आहे. मशिदींवर भोंगे असलेल्या भागात पहाटे ५ वाजता हनुमान चालिसा वाचली जाईल. चालिसा वाचण्यासाठी परवानगी मागितलेली आहे; मात्र त्याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती जाधव यांनी दिली. ठरल्याप्रमाणे सकाळी ६ वाजता, दुपारी १ वाजता आणि सांयकाळी ५ वाजता हनुमान चालिसा पठण केले जाणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.
…..
ईद सणामध्ये व्यत्यय नको म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मेऐवजी ४ मेपासून भोंगे उतरलेच पाहिजेत असा आग्रह धरला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून शासनानेच ही कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरीही या विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातो हे दुर्दैवी आहे. भोंगे उतरले नाहीत, तर राज ठाकरेंच्या आदेशाचे पालन करण्यासाठी महाराष्ट्र सैनिक सज्ज आहे.
- अविनाश जाधव

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81046 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top