आंब्याच्या झाडालाच दगड मारतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंब्याच्या झाडालाच दगड मारतात
आंब्याच्या झाडालाच दगड मारतात

आंब्याच्या झाडालाच दगड मारतात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : आंब्याच्या झाडालाच लोक दगड मारतात. बाभळीच्या झाडाकडे ढुंकूनही पाहत नाहीत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला त्या उत्तर देत होत्या. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमानिमित्त त्या ठाण्यात आल्या होत्या. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत गृहनिर्माण तथा अल्पसंख्याक मंत्री जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे, मनोहर साळवी, हणमंत जगदाळे, प्रमिला केणी, राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्ष सुजाताताई घाग उपस्थित होते.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, माझे सर्व आयुष्य मी यशवंतराव चव्हाण यांना आदर्श मानूनच जगत आलेली आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दिवस, वार याची गरज मला भासत नाही. यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राचा मंगल कलश त्यांनीच आणला. किंबहुना त्यांच्यामुळेच महाराष्ट्राकडे प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून पाहिले जात आहे. या वळी नवाब मलिकांविषयी सुळे म्हणाल्या की , मलिक हे आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांच्या मुलींनी याबाबत माझ्याशी चर्चा केली आहे. आता त्यांच्यावर चांगले उपचार सुरू आहेत.

…............................
सुप्रिया सुळे शिवसेनेच्या शाखेत
बाळकूम येथे ज्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा आहे; त्याच ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सुनील पाटील, वासुदेव भोईर आणि संतोष भोईर यांनी सुप्रिया सुळे यांना शिवसेना शाखेत येण्याचे निमंत्रण दिले. शिवसेना शाखेत प्रवेश केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता, पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याचा निर्णय आम्ही त्या वेळीच जाहीर करू. त्यासाठी आताच चर्चा कशाला, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81049 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top