भूसंपदानातील शेतकऱ्यांच्या ११ कोटींवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूसंपदानातील शेतकऱ्यांच्या ११ कोटींवर डल्ला
भूसंपदानातील शेतकऱ्यांच्या ११ कोटींवर डल्ला

भूसंपदानातील शेतकऱ्यांच्या ११ कोटींवर डल्ला

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३ (बातमीदार) ः तालुक्यातील नांदिठाणे गावातील ९ शेतकऱ्यांची जमीन मुंबई - बडोदा महामार्गामुळे बाधित झालेली आहे. या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ११ कोटी ६६ लाख ६४ रुपये मोबदल्यावर बनावट व्यक्ती उभ्या करून डल्ला मारण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. त्यामध्ये पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधवसह मनीषा पगार, प्रवीण पाटील, दिनेश पुरोहित, कृष्णमिलन शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना ६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली आहे.

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी मृत झाल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. याचा फायदा घेऊन गुरुनाथ जाधव, दिनेश पुरोहित, कृष्णमिलन शुक्ला, महेश कबाडी, मनीषा पगार, केके यांनी आपसात संगनमत करून मूळ खातेधारकांच्या जागी बोगस व्यक्ती उभ्या केल्या. या बोगस व्यक्तींना बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड देण्यात आले. नरेंद्र भोईर या २०१९ मध्येच मयत झालेल्या व्यक्तीच्या नावे सर्व अधिकार देणारे कुलमुखत्यार पत्र व संमतीपत्र बनवण्यात आले. आणि उपविभागीय कार्यालयातील मोबदल्यावर दावा करत पैसे लुबाडले.

दरम्यान पाचपाखडी येथे राहणारे मयत नरेंद्र भोईर यांचे वारस विनित भोईर, अमोल भोईर आणि हरेश भोईर या तिघांनी जमिनीच्या मोबदल्यावर दावा सांगितला. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयाला खडबडून जाग आली. त्यानंतर त्यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक शीतल राऊत करीत आहेत.
-----------
चौकट
पैशांच्या वाटणीवरून वाद
११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपये नरेंद्र भोईर यांच्या नावाने बनविलेल्या बनावट खात्यात जमा झाल्यावर त्यातील १ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम वेळोवेळी काढून ती सर्वांनी खर्च केली; तर १० कोटी रुपयांची रक्कम कृष्णमिलन शुक्ला याच्या बँक खात्यात वळवण्यात आली. तेथून ही रक्कम ज्वेलर्स दुकानदाराकडे वळवून तेथून घाऊक सोने खरेदी करून ते प्रत्येकाला वितरित करण्याचा इरादा होता; पण येथे वाटणीवरून त्यांच्यात वाद सुरू झाला. याची कुणकुण मूळ खातेधारकांना लागली व हे बिंग फुटले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81055 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top