महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर
महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर

महापालिका अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पगार लांबणीवर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेलाच होत असते. महापालिकेने पगार काढण्याचे काम खासगी यंत्रणेला दिले असल्याने त्याचा फटका कामगारांना बसला आहे. एप्रिल आणि मे महिन्याची तारीख उलटूनही अद्याप अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

पगार उशिराने होण्यामागचे कारण पालिकेकडून अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना पगार १० मे रोजी होईल असे सांगण्यात आले आहे, परंतु उशिराने पगार होणार असल्याने कर्मचाऱ्यांचे महिन्याचे नियोजन मात्र कोलमडून पडले आहे. दरम्यान, यापूर्वी जे सॉफ्टवेअर सुरू होते, ते महापालिकेच्या माध्यमातून सुरू होते, परंतु पालिकेकडे यंत्रणा अपुरी असल्याने बाहेरील नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून खासगी कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. त्यानुसार डिपार्टमेंटल ट्रेनिंग, अकाऊंटला ट्रेनिंग देणे आदींसह इतर कामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत या त्रुटी दूर करून कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81056 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top