पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक
पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक

पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक

sakal_logo
By

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मिरा रोड येथील शांती पार्क भागात असलेली पोलिस चौकी जाळण्याचा प्रयत्न एका ३० वर्षीय व्यक्तीकडून करण्यात आला; मात्र आसपासच्या नागरिकांनी तातडीने ही आग विझविल्यामुळे चौकीचे फारसे नुकसान झाले नाही. या वेळी पोलिस चौकीत कोणीही नव्हते. नागरिकांनीच या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. सोमवारी (ता. २) सायंकाळी ७.४५ च्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव सन्नी कदम असून तो भाईंदर पूर्व येथे राहणारा आहे.

सोमवारी सायंकाळी चौकीतील सर्व पोलिस कर्मचारी ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या बंदोबस्तासाठी कर्तव्यावर असल्यामुळे चौकीत कोणीही नव्हते. आरोपीने आवारात उभ्या असलेल्या दुचाकीतून पेट्रोल काढून बाटलीत भरले आणि ते पेट्रोल चौकीच्या दरवाजावर शिंपडून चौकीला आग लावून दिली. आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझविली. या घटनेत चौकीचे लाकडी दरवाजे थोड्याफार प्रमाणात जळाले; मात्र इतर कोणतीही हानी झाली नाही. नागरिकांनी आरोपीला पकडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला याआधीही गांजाचे सेवन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती, अशी माहिती मिरा रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंग बागल यांनी दिली. दरम्यान, आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81059 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top