वर्सोव्यात सलोख्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्सोव्यात सलोख्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
वर्सोव्यात सलोख्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

वर्सोव्यात सलोख्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

sakal_logo
By

जोगेश्वरी, ता. ४ (बातमीदार) ः मुंबई-जातीय सलोखा, सामाजिक बंधुता व सहिष्णुता यांचे दर्शन घडवत वर्सोव्यात इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. वर्सोव्यात तेलवण वाडी मैदान, वेसावा कोळीवाडा येथे इफ्तार पार्टीचे मोहल्ला कमिटी मुव्हमेंट ट्रस्टचे निमंत्रक प्राचार्य अजय कौल व वेसावा कोळी जमात पब्लिक रिलिजस अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते.
या वेळी वर्सोवा- यारी रोड-अंधेरी परिसरातील नागरिक उपस्थित होते. परिमंडळ नऊचे पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अजय कौल हे दिवाळी मिलन, ईद मिलन, इफ्तार पार्टी, मोफत वैद्यकीय शिबिर, क्रिकेट स्पर्धा, हळदी-कुंकू समारंभ यातून सलोखा राखण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81068 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top