शिक्षक महोत्सव उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक महोत्सव उत्साहात साजरा
शिक्षक महोत्सव उत्साहात साजरा

शिक्षक महोत्सव उत्साहात साजरा

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कांदिवली येथे नुकतेच शिक्षक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिक्षकांनी कविता, गायन आदी कला सादर केल्या.
अक्षर साहित्य कला मंच, अखिल भारतीय शिक्षक कल्याण संकल्प, तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष शिवाजी शेंडगे यांच्यातर्फे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कोरोना काळात दोन वर्षे सार्वजनिक व्यासपीठ उपलब्ध नव्हते, शाळा सुरू नव्हत्या. म्हणूनच शिक्षकांच्या कलागुणांना वाव देणारे कथालेखन, काव्यवाचन, गीतगायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचा पारितोषिक सोहळा पार पडला. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षिकांना राष्ट्रमाता पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर कर्तृत्ववान आदर्श महिला पुरस्कार देण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना बृहन्मुंबई माननीय बाळासाहेब ठाकरे आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले.
या शिक्षक महोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, तसेच मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे व माजी नगरसेविका संध्या दोशी उपस्थित होते. या महोत्सवात अनेक शिक्षकांनी आपल्या कविता-गाणी सादर करून आनंद लुटला.
...
अभिजात दर्जासाठी चळवळ
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जनजागृती चळवळ शिक्षकांच्या माध्यमातून सुरू करण्याचा संकल्प केला. त्यानुसार वर्षभर मराठी साहित्य लेखन, वाचन, उपक्रमास चालना देणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील, असे शिक्षक महोत्सवाचे आयोजक शिवाजी शेंडगे यांनी सांगितले. या शिक्षक महोत्सवास ज. मो. अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81070 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top