मानखुर्दमध्ये ईदनिमित्त शिरखुर्म्याची मेजवानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानखुर्दमध्ये ईदनिमित्त शिरखुर्म्याची मेजवानी
मानखुर्दमध्ये ईदनिमित्त शिरखुर्म्याची मेजवानी

मानखुर्दमध्ये ईदनिमित्त शिरखुर्म्याची मेजवानी

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ४ (बातमीदार) ः मानखुर्दच्या लल्लूभाई वसाहतीतील स्वराज्य संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रमजान ईदनिमित्त (ता. ३) शिरखुर्मा मेजवानीचे आयोजन केले होते. या आयोजनात स्थानिकांसह परिसरातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
समाजाची एकता अबाधित राहावी, परिसरात शांतता कायम राहावी या उद्देशाने लल्लूभाई वसाहतीतील इमारत क्रमांक १५ मधील स्वराज्य संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवारी रमजान ईदनिमित्त प्रतिष्ठानने शिरखुर्मा मेजवानीचे आयोजन केले होते. त्यामध्ये सर्वधर्मीय बांधवांसह भारतीय जनता पक्षाचे ईशान्य मुंबई उपाध्यक्ष ॲड. विजय रावराणे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका वैशाली शेवाळे, भाजपच्या प्रभाग अध्यक्ष मीरा उन्हाळे, कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यपालांनी गौरव केलेल्या डॉ. काजोल भादवे तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या सर्व जातीधर्मांचे नागरिक एकमेकांच्या श्रद्‍धेचा आदर करत सुखात एकत्र नांदत आहेत. तेच वातावरण कायम राखण्याचा प्रयत्न असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81074 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top