
पालिकेच्या अर्धवट कामाचा त्रास
धारावी, ता. ४ (बातमीदार) : शीव रेल्वे स्थानकाकडून धारावीकडे येणाऱ्या वाटेवर महात्मा गांधी मार्ग आहे. या रस्त्यावरील केला वखार येथील राम कुटीर चाळीसमोर पालिकेने भूमिगत कामासाठी रस्ता खोदला होता. खोदून ठेवलेल्या रस्त्याची दुरुस्ती न करता त्यावर पत्रे टाकून ठेवले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे मुश्कील झाले आहे.
रस्त्यावर विविध साहित्य विक्रीची होलसेल व किरकोळ विक्रेत्यांची मोठी दुकाने व कारखाने आहेत. यामुळे रस्त्यावर जड व हलक्या वाहनांची सतत वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतूक कोंडी झाली की, सर्व वाहने एकाच जागी थांबून राहतात. रस्त्यावर मासळी बाजार आहे. मासळी खरेदीसाठी गिऱ्हाईक गर्दी करतात. यामुळे रस्त्यावरून चालणे कठीण होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेने खड्डा खोदून ठेवला आहे. भूमिगत काम लवकरात लवकर आटपून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी पादचारी व स्थानिक रहिवासी करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81077 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..