शहापुरमधील शेतकऱ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरमधील शेतकऱ्यांचा गौरव
शहापुरमधील शेतकऱ्यांचा गौरव

शहापुरमधील शेतकऱ्यांचा गौरव

sakal_logo
By

शहापूर, ता. ४ (बातमीदार) ः शहापूर तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा कृषी पुरस्कार देऊन राज्य सरकारकडून गौरव करण्यात आला. अस्नोली येथील संतोष अमृता दिनकर यांना ‘उद्यान पंडित’; तर अंबर्जे येथील राजूबाई गुणाजी वाघे व वेहळोली येथील गंगाधर धाऊ वाख या शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वेहळोली येथील गंगाधर धाऊ वाख यांचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याने हा पुरस्कार त्यांची पत्नी संगीता व मुलगा राजेश यांनी स्वीकारला, अशी माहिती कृषी सहाय्यक राम बबीरवाळ यांनी दिली. या कार्यक्रमात शेतकाऱ्यांसोबत तालुका कृषी कार्यालयातील विजय लाडे, राम बाबीरवाळ व सचिन भालेराव हे कृषी सहाय्यक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81078 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top