
उल्हासनगरात १३४ धोकादायक इमारती
उल्हासनगर, ता. ४ (वार्ताहर) ः पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने उल्हासनगरातील १३४ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असून त्यात केवळ एकच इमारत ही अतिधोकादायक आहे. धोकादायक इमारतींपैकी ११२ इमारतींची संरचनात्मक दुरुस्ती शक्य असून त्यामध्ये ७२ इमारतींना खाली न करता त्यांची संरचनात्मक दुरुस्ती करण्यास परवानगी देण्यात आली आहे; तर ४० इमारतीखाली करून त्यांच्या संरचनात्मक दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या धोकादायक इमारतीच्या यादीनुसार प्रभाग समिती एकमध्ये ३०, प्रभाग समिती दोनमध्ये ४९, प्रभाग समिती तीनमध्ये २५ आणि प्रभाग समिती चारमधल्या ३० अशा एकूण १३३ मालमत्ता या धोकादायक असल्याचे समोर आले आहे; तर प्रभाग समिती एकमधील गुलमोहर अपार्टमेंट ही एकमेव अतिधोकादायक इमारत असून ती खाली करण्यात आली आहे.
वर्षभरात २५ इमारती जमीनदोस्त
मागील वर्षभरात २५ पेक्षा अधिक अतिधोकादायक इमारती पालिकेने जमीनदोस्त केल्या आहेत. त्यामुळे यंदा शहरात एकच अतिधोकादायक इमारत असलेल्या पालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे अतिधोकादायक इमारत खाली करण्यात आली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81079 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..