विकास कामांवर ठाणेकर खूष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास कामांवर ठाणेकर खूष
विकास कामांवर ठाणेकर खूष

विकास कामांवर ठाणेकर खूष

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ : विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांत भरीव कार्य केले आहे. हे येथे आल्यावर समजते. विविध योजनांची विस्तृत माहिती तर आहेच; परंतु त्याचे प्रत्यक्ष फोटोदेखील पाहायला मिळत असल्याने खात्री पटत असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ठाणेकर देत आहेत.
कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत सचित्र प्रदर्शनाचे आयोजन ठाण्यातील ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळच्या सुमारास सहकुटुंब आलेल्या स्वानंद वैद्य यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर सरकारच्या विकासकामांना पोचपावती दिली.
प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असून त्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांची विस्तृत माहिती मिळत असल्याचे ते सांगत आहेत. भक्कम तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या विविध विभागांनी गेल्या दोन वर्षांत केलेल्या विकासकामांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांची माहिती देणारे स्वतंत्र पॅनेलही याठिकाणी लावण्यात आले आहे.

शिवभोजन अन् सेल्फी
प्रदर्शन पाहत असताना शिवभोजन योजनेबाबत माहिती देणाऱ्या पॅनेलजवळ मुलुंडचे विशाल कुलकर्णी थांबले आणि म्हणाले, घाटकोपरला मी स्वत: शिवभोजनाचा आस्वाद घेतला आहे. अतिशय चांगली योजना असून राज्य शासनाने विविध लोकोपयोगी निर्णय घेऊन शेतकरी, सामान्य नागरिकांना दिलासा दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रदर्शन पाहण्यासाठी येणारे नागरिक या माहिती फलकांसोबत आपला सेल्फी घेत असल्याचे चित्रही दिसत आहे. याठिकाणी ठेवण्यात आलेल्या अभिप्राय नोंदवहीतही नागरिक आपल्या प्रतिक्रिया नोंदवित आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81080 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top