‘उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीवर भर द्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीवर भर द्या’
‘उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीवर भर द्या’

‘उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रीय शेतीवर भर द्या’

sakal_logo
By

ठाणे, ता. ४ ः जिल्ह्यातील शेती उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय शेतीबरोबरच पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतीला पाणी मिळावे, यासाठी कृषी विभागाने पाण्याचे स्रोत शोधून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. शाफ्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पालकमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात झाली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.
गेल्या वर्षी झालेल्या खरीप हंगामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच सन २०२२-२३ च्या खरीप हंगामाच्या नियोजनावर चर्चा झाली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माहिती पुस्तिकेचे व पोस्टरचे प्रकाशन पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. खेवारे येथे शाफ्ट तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना सुरू केली. अशा तंत्रज्ञानामुळे कमी खर्चात जास्त क्षेत्र पाण्याखाली येते. त्यामुळे जिल्ह्यात आणखी १२ ठिकाणी अशा प्रकारची योजना सुरू राबवावी. जिल्हा वार्षिक नियोजनाच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्ह्यात माती परीक्षणासाठी फिरते परीक्षण वाहनासाठीही जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी पालकमंत्र्यांसह आमदार निधीतूनही मदत मिळेल. शेती किफायतशीर होण्यासाठी गट शेतीला प्रोत्साहन देण्यात यावे. तसेच त्यांच्या मालासाठी विक्री व्यवस्थाही करण्यात यावी, विकेल ते पिकेल योजनेनुसार शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने साह्य करावे. संत सावता माळी आठवडे बाजाराच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीसाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहसंकुलात जागा द्यावी. जेणेकरून नागरिकांनाही ताजी व स्वच्छ भाजी मिळेल. जिल्ह्यातील भेंडी उत्पादन वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.
असे आहे
खरीप २०२२-२३ चे नियोजन
-जिल्ह्यातील सुमारे ७७ हजार हेक्टर पडीक जमिनीवर पेरणीचे नियोजन.
- त्यामध्ये भात शेतीचे ५६ हजार हेक्टर
- नाचणीचे ७ हजार ८१.६५ हेक्टर
- तूरचे १० हजार हेक्टर पेरणीचे नियोजन
- बांधावरही तूर लागवडीवर भर
- तृणधान्ये, इतर डाळी, गळीत धान्ये व कडधान्यांची ४२८५.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81081 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top