कुर्ल्यातील वीजपेट्या धोकादायक अवस्थेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ल्यातील वीजपेट्या धोकादायक अवस्थेत
कुर्ल्यातील वीजपेट्या धोकादायक अवस्थेत

कुर्ल्यातील वीजपेट्या धोकादायक अवस्थेत

sakal_logo
By

कुर्ला, ता. ४ (बातमीदार) ः कुर्ल्यातील अनेक भागांत वीजपेट्यांची दुरवस्था झाली आहे. बाहेर आलेल्या वीजवाहिन्या आणि विद्युत पेट्या उघड्या असल्याने एखाद्यास शॉक लागून दुखापत होऊ शकते. या समस्येचे संबंधितांनी वेळीच निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.
कुर्ला ईस्ट बस डेपोमधील बसस्थानकाच्या लगत वीजपेट्या उघड्या पडलेल्या आहेत. वीजवाहिन्या वीजपेटीतून बाहेर पडलेल्या अवस्थेत आहेत. बस स्थानक असल्याने येथे हजारो नागरिक रांगा लावून उभे असतात. नागरिकांना शॉक लागून दुखापत होऊ शकते. कुर्ल्यातील ठक्कर बाप्पा चाळीत गल्ल्यांमध्ये विद्युत पेट्यांची दारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. नेहरूनगर सोसायटी मार्गावरही अनेक वीजपेट्या झुकलेल्या अवस्थेत आहेत. त्यातील वीजवाहिन्या बाहेर पडलेल्या आहेत. तिथे काही दिवसांपूर्वी त्या वीजपेटीत शॉटसर्किट होऊन आगही लागली होती. रोज या ठिकाणाहून अनेक नागरिकांची, लहान मुलांची वर्दळ चालू असते. त्यामुळे येथे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात या उघड्या विद्युत पेट्यांमध्ये पाणी जाऊन शॉटसर्किट होण्याची भीती येथील नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्याआधीच या पेट्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81089 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top