नेरुळ स्थानकाबाहेर भिकाऱ्यांचे बस्तान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नेरुळ स्थानकाबाहेर भिकाऱ्यांचे बस्तान
नेरुळ स्थानकाबाहेर भिकाऱ्यांचे बस्तान

नेरुळ स्थानकाबाहेर भिकाऱ्यांचे बस्तान

sakal_logo
By

बेलापूर, ता. ४ (बातमीदार) ः नेरूळ रेल्वे स्थानकाबाहेर पदपथांवर भिकारी व बेघरांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानकाच्या बाहेर रिक्षा स्टँडच्या जवळ असलेल्या पदपथावरील संपूर्ण मोकळ्या जागेत भिकाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिक व वाहनधारक करत आहेत.

नेरूळ रेल्वे स्थानकाच्या बाहेर रिक्षा स्टँड असल्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते; मात्र या परिसरात भिकारी आणि बेघरांची संख्या वाढली आहे. स्थानकाच्या परिसरात पथारी पसरून बसलेल्या भिकाऱ्यांचा रात्रीच्या वेळी भांडणाचा आवाज येतो. त्यामुळे नागरिक येथून जाण्यास घाबरतात. यातच हे भिकारी थेट रस्त्यावर धाव घेत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी वाहनधारक आणि पादचाऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81090 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top