
बेकायदा फेरीवाल्यांमुळे रहदारीला अडथळा
बेलापूर, ता. ४ (बातमीदार) ः शहरातील पदपथ बेकायदा फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे वर्दळीच्या परिसरात विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
शहरातील बेलापूर, नेरूळ आदी विभागांमध्ये बेकायदा फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. त्यांनी पदपथ आणि रस्त्याच्या कडेला व्यवसाय थाटले आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडी तसेच लहान-मोठे अपघातदेखील घडत आहेत. महापालिकेचा अतिक्रमण विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच नेरूळ व बेलापूर रेल्वे स्थानकांच्या बाहेरील पादचारी पुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या पुलावरदेखील फेरीवाल्यांनी दुकाने थाटली असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81093 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..