
समूहगान स्पर्धा उत्साहात साजरी
कळंबोली, ता. ४ : म. ए. सो. ज्ञानमंदिर प्रशाला आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. यानिमित्ताने शाळेत विविध कार्यक्रम, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातलाच एक भाग म्हणून संस्थेच्या कलावर्धिनी अंतर्गत आंतरशालेय समूहगान स्पर्धेचे आयोजन शुक्रवार रोजी (ता. २९) करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणऊन राहुल हजारे उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये संस्थेच्या पुणे, सासवड आणि कळंबोली येथील शाळांनी सहभाग नोंदवला. तसेच १२६ शिक्षक सहभागी झाले. स्पर्धेचे परीक्षण तबलावादक अजय भाटवडेकर व संगीतविशारद पद्मजा जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक गोविंद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शाळा वेगवेगळे उपक्रम आयोजित करून शाळा व संस्थेची ध्येयधोरणे समाजापर्यंत पोहोचवत आहे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे ते म्हणाले. तिन्ही विभागांच्या मुख्याध्यापिका रोहिणी गायकवाड, संजना बाईत, प्रियांका फडके यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळा समिती अध्यक्ष देवदत्त भिशीकर आणि प्रा. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81094 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..