विष्णुदास भावे नाट्यगृहात नटराज मूर्तीचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विष्णुदास भावे नाट्यगृहात नटराज मूर्तीचे अनावरण
विष्णुदास भावे नाट्यगृहात नटराज मूर्तीचे अनावरण

विष्णुदास भावे नाट्यगृहात नटराज मूर्तीचे अनावरण

sakal_logo
By

वाशी, ता. ४ (बातमीदार) ः वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात दर्शनी भागात नाट्यदेवता नटराज मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले व अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले. ब्राँझ धातूची १६५ किलो वजनाची ही ६ फूट उंच आकर्षक नटराज मूर्ती शिल्पकार रवी वाडकर यांच्या संकल्पनेतून व सजावटीतून साकारलेली आहे. या वेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपायुक्त मनोजकुमार महाले, कार्यकारी अभियंता अजय संखे, वाशी विभागाचे सहायक आयुक्त सुखदेव येडवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रशांत दामले म्हणाले, की स्वच्छ व सुंदर असा देशात नावलौकिक असणारे नवी मुंबई शहर नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात नेहमीच आघाडीवर असते. येथे सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या सुविधांच्या देखभालीवरही विशेष लक्ष दिले जाते. विष्णुदास भावे नाट्यगृह हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे ते म्हणाले; तर नवी मुंबई नावाप्रमाणेच नावीन्याला प्राधान्य देत असून अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर नाट्यदेवता नटराज मूर्तीचे अनावरण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले, अशा शब्दांत वर्षा उसगावकर यांनी आनंद व्यक्त केला. तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहातील नियोजित ग्रंथालयाची संकल्पना अभिनव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले; तर ही नटराज मूर्ती नाट्यगृहाच्या सौंदर्यात भर घालेल, असा विश्वास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81095 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top