मधुबन लेडीज बारवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मधुबन लेडीज बारवर कारवाई
मधुबन लेडीज बारवर कारवाई

मधुबन लेडीज बारवर कारवाई

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (बातमीदार) : गुन्हे शाखा व पोलिसांनी संयुक्तरीत्या वाशीतील ‘मधुबन'' या लेडीज बारवर सोमवारी (ता. २) मध्यरात्री छापा मारून १२ महिला, वेटर, मॅनेजरसह एकूण १८ जणांना ताब्यात घेतले आहे. या बारमधील महिला ग्राहकांसोबत अश्लील हावभाव व अंगविक्षेप करताना आढळून आल्याचे सांगून पोलिसांनी ही कारवाई केली.

वाशी सेक्टर-१७ मधील ‘मधुबन'' या लेडीज बारमध्ये काम करणाऱ्या महिला ग्राहकांसोबत अश्लील वर्तन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष, तसेच युनिट-३ च्या पथकाने वाशी पोलिसांच्या मदतीने सोमवारी मध्यरात्री बारवर छापा मारला. यावेळी बारमध्ये काम करणाऱ्या महिला ग्राहकांसोबत अश्लील चाळे करत असल्याचे, तसेच बारचा मॅनेजर व वेटर त्यांना प्रोत्साहन देताना आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी १२ महिला, वेटर व बारचा मॅनेजर यासह १८ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81096 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top