
युवा सेनेकडून दुचाकीस्वारांना मोफत इंधन वाटप
नेरुळ, ता. ४ (बातमीदार) ः गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन दरात वाढ होत आहे. युवा सेनेकडून याचा नागरिकांना पेट्रोलची भेट देत निषेध करण्यात आला. युवासेनेचे बेलापूर विधानसभा अधिकारी निखिल मांडवे यांच्या नेतृत्वाखाली हे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले.
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मोफत इंधन वाटप कार्यक्रमाचे बेलापूर विधानसभा युवा सेनेकडून आयोजन करण्यात आले. पाम बीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर सहामधील पेट्रोल पंपावर जवळपास १२५ दुचाकी वाहनांना प्रत्येकी १ लिटर पेट्रोल युवा सेनेकडून निखिल मांडवेंच्या नेतृत्वाखाली मोफत देण्यात आले.
या वेळी बेलापूर विधानसभा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विशाल ससाणे, उपविधानसभा युवा अधिकारी आशिष वास्कर, सिद्धाराम शिलवंत, बेलापूर विधानसभेचे चिटणीस प्रवीण कांबळे, सतीश वाघमारे, समन्वयक सचिन कवडे, सुशील सुर्वे, बेलापूर विधानसभा सोशल मीडिया अधिकारी साईनाथ वाघमारे, विक्रांत विग, विभाग अधिकारी अजित खताळ, विनायक धनावडे, स्वप्नील भिलारे, संकेत मोरे, तसेच युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81098 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..